भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपणा वेगळा कशाला निवडिसी कां मज दवडिसी सांग नाम्या

apana vegala kashala nivadisi kan maj davadisi sang namya

रचनाकार: संत गोणाई · अभंग
आपणा वेगळा कशाला निवडिसी कां मज दवडिसी सांग नाम्या ॥१॥ बरवें पुत्रपण जालासी । उत्तीर्ण। आतां अभिमान पाहें माझा ॥२॥ तुज नेल्यावीण नवजाय येथून पंढरी गिळीन विठोबासहित ॥३॥ माझेंसी लेकरूं मज आहे वेव्हारू। मज आहे निर्धारू विठोबासी ।।४।। हा दानवांतें छळी आपणा म्हणवी बळी। तें मजजवळी न चले कांहीं ॥५॥ विटेसहित चरणीं बांधिन आपुला गळा क्षण जीवा वेगळा जाऊं नेदी ॥६॥ आसनीं शयनी न विसंबे भोजनी पालिन मुरडोनि हृदयामाजी ||७|| या देहाचा संकल्प आले करोन। घातलेंसे पाणी घरादारां ॥८॥ हा त्रिभुवनीं समर्थ मी असें जाणत पाहेन पुरुषार्थ आजी याचा ||९|| अठ्ठाविस युर्गे भरली तथा बोला धरोनि उभा केला पुंडलिकें ।।१०।। गोणाई म्हणे देवा होई कां शहाणा वायां कां परधना धरिसी लोभु । । ११ ।।