भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपणासि आपण उपदेशु कीजे

apanasi apan upadeshu kije

आपणासि आपण उपदेशु कीजे । गुरुमुखें बुझिजे तेंचि तूं ॥१॥ मी तें कवण हें तूं जाण । बुझें निर्वाण तेंचि तूं ॥२॥ सिध्दचि सांडूनि निघसी अनानीं ठाई । तूं रिघेपां सोई संताचिये ॥३॥ जें तपाव्रतांचे ठायीं ते येथेंचि पाही । परि ते ठाईच्या ठाई म्हणे ज्ञानदेवो ॥४॥