भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपणा सारिखें । देखे नाढळे पारिखे

apana sarikhen | dekhe nadhale parikhe

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आपणा सारिखें । देखे नाढळे पारिखे ॥१॥ गुरुकृपा तो लाधला । व्यापुनी चराचर एकला ॥२॥ निंदा स्पर्धा व्देषाव्देष । तुटले कामक्रोध पाश ॥३॥ निळा म्हणे पात्र सुखा । झाला एकाएकीं देखा ॥४॥