भजनी मालिका
← भजनांकडे परत

आप तेज वायू पृथिवी गगन । मेलें तें कवण पंचामध्यें

ap tej vayu pruthivi gagan | melen ten kavan panchamadhyen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आप तेज वायू पृथिवी गगन । मेलें तें कवण पंचामध्यें ॥१॥ आम्हां मरण नाहीं मरशील काई । आत्मवस्तु पाही श्रीगुरुमुखें ॥२॥ जिताची मरण आलेंसें हातां । मरण बोलतां लाज नये ॥३॥ खेचर विसा म्हणे आम्हां मरण नाहीं । कैसें मरण पाही आलें नाम्या ॥४॥