भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपण चि व्हाल साहे । कार्य आहे निर्वाणीचे

apan chi vhal sahe | karya ahe nirvaniche

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपण चि व्हाल साहे । कार्य आहे निर्वाणीचे ॥१॥ भाकिली ते उरली कींव । आहे जीव जीवपणें ॥ध्रु.॥ आहाच कैंचा बीजा मोड । प्रीति कोड वांचूनि ॥२॥ तुका म्हणे दंडिन काया । याल तया धांवणिया ॥३॥