भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपणा समान केलें त्यासी । धरिलें ज्यासी निजहातीं

apana saman kelen tyasi | dharilen jyasi nijahatin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आपणा समान केलें त्यासी । धरिलें ज्यासी निजहातीं ॥१॥ ऐसा देवो कृपासिंधु । म्हणोनि बंधु दीनांचा ॥२॥ हीनत्व देखोनि भक्तां अंगीं । लाजे जगीं त्याचेनि ॥३॥ निळा म्हणे करुनी थोर । चालवी बडिवार निजांगें ॥४॥