भजनी मालिका

भजने

धिग्‍ तो ग्राम धिग्‍ तो आश्रम । संत समागम नाहीं जेथें ॥१॥ धिग्‍ ते संपत्ति धिग्‍ ते संतति । भजन सर्वांभूतीं नाहीं जेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धीर धरीं सत्य हें तो नारायणा । शुद्ध आचरणां न सांडावें ॥१॥ लैकिकाची कांहीं न धरावी लाज । हेंचि निज काज साधावें तें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धूप आणि दीप उजळिल्या ज्योति । तेव्हां ओसंडती अवघे जन ॥१॥ सोपान वटेश्वरें केला नमस्कार । उतरले पार भवसिंधू ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धूप पंचारती गंधाक्षता वाहती । पूजिला निवृत्ति वैष्णवांनीं ॥१॥ प्रेमें आसुवें येती सकळांचिये डोळां । माळ घाली गळां पुंडलिक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धेनु विये वनीं तीसि कैचि सुयणी । तरीं ते वत्स स्तनीं लावी कवण ॥१॥ भुजंगाचीं पिलीं उपजतांचि वेगळीं । त्यांसी डेखूं शिकविलें हो कोणी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धोंडोबा नामदेवें काढिला बाहेरी । अंतर्बाह्याक्तारीं सोनें जालें जालें ॥१॥ दामासेठी पाहुनी नामयासी बोले । वेर्थ म्यां छळिलें तुज बाळा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धोंड्यासी व्यापार कोणी नाहीं केला । आज म्यां ऐकिला वृत्तांत तुझा ॥१॥ उभयतां ऐसी बोलती पैं गोष्टी । तंव दामशेटी घरीं आला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ध्यान सांवळें गोकुळींचें । धांव पाव वेगीं हरी सांवळिया ॥ध्रु०॥ सांवळीसी आंगीं उटी । सांवळी कस्तुरी लल्लाटीं ।

रचनाकार: संत नामदेव