भजनी मालिका
← भजनांकडे परत

धीराचे पैं धीर उदार ते पर

dhirache pain dhir udar te par

धीराचे पैं धीर उदार ते पर । चोखाळ अमर अभेदपणें ॥ १ ॥ तें हें चतुर्भुज कृष्णरूपें खेळे । माजि त्या गोपाळें छंदलग ॥ २ ॥ किडाळ परतें चोखाळ अरुतें । मी माझें हे कर्ते तेथें नाहीं ॥ ३ ॥ निवृत्ति धर्मता विचारे चोखाळ । सर्वत्र गोपाळ सखा आम्हां ॥ ४ ॥