भजनी मालिका
← भजनांकडे परत

ध्यानाची धारणा उन्मनीचे बीज

dhyanachi dharana unmaniche bij

ध्यानाची धारणा उन्मनीचे बीज । लक्षितां सहज नये हातां ॥ १ ॥ तें हें कृष्णनाम सखे नंदघरी । गौळियां माझारी ब्रह्म खेळे ॥ २ ॥ न दिसे पाहतां शेषादिका गति । यशोदे श्रीपति बाळ झाला ॥ ३ ॥ गुंतलें मायाजाळीं अनंत रचनें । तो चतुरानना खुणें न संपडे ॥ ४ ॥ नकळे हा निर्धारू तो देवकी वो देवी । शेखीं तो अनुभवीं भुलविला ॥ ५ ॥ निवृत्ति रचना कृष्णनामें सार । नंदाचें बिढार ब्रह्म झालें ॥ ६ ॥