भजनी मालिका

भजने

तरिच पिंग्या गोडि गे लावोनि आंग मोडी । नाहीं तरी परती सर म्हणती जा घांगडी ॥१॥ फिरविसी मान जरी हरीतें लक्षून । तरीच खेळ रुचेल तुझा मानवती जन ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तरिच बरवंटा गे लई लई लखोटा । फिरोनियां नवजसी यमपंथें वाटा ॥१॥ लखोटयाच्या भारें गे नवजाये चाचरी । धरुनियां तारा निजवृत्ति हे सावरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तरीं आम्ही तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥१॥ आगा पंढरीच्या उभ्या विटेवरी । येई लवकरी धांवें नेटे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तरी का माझा केला अंगिकार । आतां विचार करिसी वायां ॥१॥ तुज मी ठाऊक होतों अन्याई । हा खरा तेव्हा कां विचार केला नाहीं ॥२॥

रचनाकार: संत सेना

तरीं भलें वांयां गेलों । जन्मा आलों मागुता । म्हणऊनि ठेलों दास । सावकास निर्भयें ॥१॥ उणें पुरें काय माझें । त्याचें ओझें तुम्हांसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तरी सोहं नव्हे याग । सोहं नव्हे त्याग । आणि अष्टांग योग । सोहं नव्हे ॥१॥ सोहं नव्हे दान । सोहं नव्हे तीर्थ । मंत्रादि दीक्षित । सोहं नव्हें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तरी हांव केली अमुप व्यापारें । व्हावें एकसरें धनवंत ॥१॥ जालों हरीदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तरुणी रजकी नूतन यौवनी । बैसली रुसुनी एकान्तासी ॥१॥ धुंडुनियां मातें धाडी सासुरिया । तो म्हणे मी राया ऎसा नोहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तळमळी चित्त दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥१॥ वचनीं च संत पावले स्वरूप । माझें नेदी पाप योगा येऊं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तळवे तळहात टेंकीत । डाव्या गुडघ्यानें रांगत । रंगणी रंगनाथ । तो म्यां देखिला सये ॥१॥ गवळण जसवंती पैसांगे । आलेवर कृष्णाचेनि मागें ।

रचनाकार: संत नामदेव

तळियाचे पाळीं वृक्षावरी बैसुनी । कैसा चातक बोभाइतो रे । ताहाना फुटे परी उद्क नेघे । मेघाची वाट पाही रे ॥१॥

रचनाकार: संत नामदेव