भजनी मालिका
← भजनांकडे परत

तळमळी चित्त दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली

talamali chitta darshanachi asha | bahu jagadisha karuna keli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तळमळी चित्त दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥१॥ वचनीं च संत पावले स्वरूप । माझें नेदी पाप योगा येऊं ॥ध्रु.॥ वेठीऐसा करीं भक्तीवेवसाय । न पवे चि जीव समाधान ॥२॥ तुका म्हणे कई देसील विसांवा । पांडुरंगे धांवा घेतें मन ॥३॥