भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरीच येईन पंढरीस । दृष्टी देखेन ज्ञानेश

tarich yein pandharis | drushti dekhen dnyanesh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तरीच येईन पंढरीस । दृष्टी देखेन ज्ञानेश ॥१॥ ज्ञानदेवा भेटी व्हावी । ऐशी सोय देवा लावी ॥२॥ ऐशियाच्या कृपादानें । तुम्हां संगतीं नाचणें ॥३॥ पंढरीचें जें सुख । जाणे तो एक भाविक ॥४॥