भजनी मालिका
← भजनांकडे परत

तळवे तळवटीं असे । विटें फ़ावलें अनयासें

talave talavatin ase | viten फ़avalen anayasen

तळवे तळवटीं असे । विटें फ़ावलें अनयासें ॥१॥ आम्हां न संडवे पंढरी । विठ्ठलराज विटेवरी ॥ध्रु०॥ जानु जघन बरवे दिसे । ते देखोनि मन उल्हासे ॥२॥ पदकमळ जोडिलें । तेथें मुनिजन रंगलें ॥३॥ कासे कसिला पितांबरु । चरणीं ब्रिदाचा तोडरु ॥४॥ नाभीकमळीं जन्म असे । ब्रह्मादिंका अपैसे ॥५॥ हस्तकडगे बाहुवटे । विठोबा शृंगार गोमटें ॥६॥ अंगीं चंदनाची उटी । ते देखोनि मन संतुष्टी ॥७॥ गळा वैजयंती माळा । मणीमंडित वक्षस्थळा ॥८॥ कानीं कुंडलें झळाळा । श्रीमुख दिसतें वेल्हाळा ॥९॥ वदन सकुमार गोजिरें । जैसे पोवळिवेल साजिरे ॥१०॥ दंतपंक्ति झळाळ । जैसी मणिकाची किळ ॥११॥ नाशिक मनोहर दिसे । जैसें वोतिलेंसे मुसें ॥१२॥ लोचन बरवें विशाळ । श्रवणीं कुंडलें झळाळ ॥१३॥ टिळक रेखिला मृगनाभीचा । बाप राजा मन्मथाचा ॥१४॥ माथां मुगुट झळाळित । बाप पुंडलिका न्याहाळित ॥१५॥ निवृत्तिदास शरणांगत । विठ्ठला चरणींचे आरत ॥१६॥