भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरिच पिंग्या गोडि गे लावोनि आंग मोडी । नाहीं तरी परती सर म्हणती जा घांगडी

tarich pingya godi ge lavoni ang modi | nahin tari parati sar mhanati ja ghangadi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तरिच पिंग्या गोडि गे लावोनि आंग मोडी । नाहीं तरी परती सर म्हणती जा घांगडी ॥१॥ फिरविसी मान जरी हरीतें लक्षून । तरीच खेळ रुचेल तुझा मानवती जन ॥२॥ राये उभी नीट गे होउनियां धीट । नाहींतरी झोंके खातां म्हणती फटफट ॥३॥ निळा म्हणे श्रीहरि गे आठवी अंतरीं । तरीच पिंगा मानेल जगा धन्य म्हणती नारी ॥४॥