भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरुणपण भर देही । पुढे नाठवे काही

tarunapan bhar dehi | pudhe nathave kahi

रचनाकार: संत बोधले · अभंग
तरुणपण भर देही । पुढे नाठवे काही । भ्रांती हे येत डोळा । तेणे पडिलो वाही। माझे माझे म्हणता रे अंती न चले काही । गुरुवचन भावबळे । विश्वासे राही ॥१॥ रामकृष्ण वासुदेवा। घरी संतसंग सेवा । त्याणेची हीत होईल । मग पावसील देवा । वाया तु नवजासी करी गुरुची सेवा । आता तरी सावध होई का भुललासी मुढा । व्यर्थ तु पडु नको पाहे मायेच्या खोडा ॥२॥ प्रपंच महाझट त्याने लागिले वेढा । स्वहित नव्हेची काही घट मुष्टीच्या हुंडा ॥३॥ सहज विचारीता हीत आपणासी । सदगुरु शरण जावे तनमन धनेसी । जैसे तु जाणोनिया का मुढ बा होसी । न परतोनी पाहे बापा मग सुख पावसी ॥४॥ पैल तो जीव पाहे कैसी उडते मासी । मोहळ रचियले बहुता सायासी । आणिके झाडीपले काही नव्हे बा तिसी । तैसा तु गुंतु नको व्यर्थ या मायसी ॥ ५॥ माझी मज होईल म्हणोनी केली खटपट । वृध्दपण पातलिया अवघ्या येईल वीट । म्हणऊन दृढ धरी गुरुचरण निकट ॥६॥ माया हेलाव पाही कैसी लागली पाठी । म्हणऊनी शरण आलो पायी घातली मिठी । कृपाळु हरि माझी केली वासनेची तुटी । बोधला म्हणे आता कृपाळु जगजेठी ॥७॥