भजनी मालिका
← भजनांकडे परत

तळवे तळहात टेंकीत । डाव्या गुडघ्यानें रांगत । रंगणी रंगनाथ । तो म्यां देखिला सये

talave talahat tenkit | davya gudaghyanen rangat | rangani ranganath | to myan dekhila saye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तळवे तळहात टेंकीत । डाव्या गुडघ्यानें रांगत । रंगणी रंगनाथ । तो म्यां देखिला सये ॥१॥ गवळण जसवंती पैसांगे । आलेवर कृष्णाचेनि मागें । येणें येणें वो श्रीरंगें । नवनीत माझें भक्षिलें ॥२॥ एक्या हातीं लोण्याचा कवळु । मुख माखिलें अळुमाळु । चुंबन देतां येतो परिमळु । नवनीताचा ये सये ॥३॥ येणें माझें कवाड उघडिलें । येणें शिंकें हो तोडिलें । दह्यादुधातें भक्षिलें । उलंडिलें ताकातें ॥४॥ ऐसें जरी मी जाणतें । यमुनापाणिया नव जातें । धरूनि खांबासी बांधितें । शिक्षा लावितें गोविंदा ॥५॥ ऐसा पुराण प्रसिद्ध चोर । केशव नाम्याचा दातार । पंढरपुरीं उभा विटेवर । भक्त पुंडलिकासाठीं ॥६॥