भजनी मालिका

भजने

जेणें कीर्तनीं धरिली निष्ठा । झाला वरिष्ठा तो ॥१॥ पहा प्रल्हाद दैत्यवंशी । झाला देवासी परम पूज्य ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥१॥ येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेणें छत्र सिंव्हासन । दिधलें आसन त्रिणाचें त्या ॥१॥ काय उर्त्तीण होईजे रंकें । तेंचि म्यां मशकें संतचरणा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेणें जेणें आमुच्या मना समाधान । तें तें करुं ध्यान तुमचें देवा ॥१॥ करुनाकर तुम्हीं पतितपावना । अहो नारायणा वेदवंद्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेणें तुज जालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आम्ही ॥१॥ नाहीं तरी तुज कोण हें पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेणे नाम धरिलें कंठीं । धावें त्यांच्या पाठीं पोटीं ॥१॥ नामें गातां जनीं वनी । आपण उभा तेथे जाउनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेणें नाहीं केलें आपुलें स्वहित । पुढिलांचा घात इच्छीतसे ॥१॥ संचितासी जाय मिळोनियां खोडी । पतनाचे ओंडीवरी हांव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेणें पृथ्वीसीं धरीलें । सूर्या प्रकाश उटिलें । चंद्रबिंबीं अमृत ठेविलें । तेणें निववीत जगा तो ॥१॥ गगना पवाडू दिधला । मेरुस्तंभ उभारिला । गती पवनही उडविला । दाही दिशा फिरतसे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेणें मंथुनि क्षीरार्णव । काढिलीं अपूर्व दिव्य रत्नें ॥१॥ त्याचा महिमा वर्णूं कैसा । भरोनी आकाशा कोंदला तो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेणें माझी वाचस्पती । आपुल्या कृपें केली सरती ॥१॥ त्याचें उत्तीर्ण होउं म्हणतां । जीवा जीवपण नुमसे आतां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देई प्रेमसुख ॥१॥ देहभाव राख दीन करूनियां । जनाचारी वायां जाय तैसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेणें माझें हित होईल तो उपाव । करिसील भाव जाणोनियां ॥१॥ मज नाहीं सुख दुःख तया खंती । भावना हे चित्तीं नाना छंदें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेणें रचियेलें भूगोळा । एकवीस स्वगें लावुनी माळा ॥१॥ तो हा विटे उभा ठेला । भक्तें पुंडलिकें पूजिला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥१॥ जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाउलें सम चि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम