भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणे नाम धरिलें कंठीं । धावें त्यांच्या पाठीं पोटीं

jene nam dharilen kanthin | dhaven tyanchya pathin potin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जेणे नाम धरिलें कंठीं । धावें त्यांच्या पाठीं पोटीं ॥१॥ नामें गातां जनीं वनी । आपण उभा तेथे जाउनी ॥२॥ नामासाठी मागें धावें । इच्छिअलें तेणे पुरवावें ॥३॥ यातीकुळ तयाचें । न पाहे कांही सांचें ॥४॥ वर्णाची तों चाड नाहीं । नाम गातां उभा नाहीं ॥५॥ एका जनार्दनीं भोळा । नामासाठीं अंकित जाला ॥६॥