भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें माझी लपविली पिवळी गोटी

jenen majhi lapavili pivali goti

जेणें माझी लपविली पिवळी गोटी । उलट भवर्‍याची चोरी घाली पाठी । पाहे पाहे कंचुकी सोडूनी गाठी । हृदयीं शंकोनि एकांत घाली मिठी वो ॥१॥ पहा पहा सांवळा कैसा धीट । बोली बोलूं नये बोलतो उद्धट । याच्या बोलण्याचा कोणा नये वीट । याजवरोनि देह ओंवाळा संपुष्ट ॥२॥ अवचित माझ्या डोळ्यांत गेलें कणू । फुंकोनि काढितां वाटलें समाधानु । शहाणा तुझा गे कानडा नारायणु । चुंबन घेतां नाठवे देहभानु ॥३॥ नवनीत देखोनि लावितो लाडीगोडी । गुनी खुणाविता राजस डोळे मोडी । आगमानिगमा न कळे याच्या खोडी । तुकयाबंधु चरणीं हात जोडी ॥४॥