भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें वाढे अपकीर्ती । सर्वार्थी तें वर्जावें

jenen vadhe apakirti | sarvarthi ten varjaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेणें वाढे अपकीर्ती । सर्वार्थी तें वर्जावें ॥१॥ सत्य रुचे भलेपण । वचन तें जगासी ॥ध्रु.॥ होइजेतें शूर त्यागें । वाउगें तें सारावें ॥२॥ तुका म्हणे खोटें वर्म । निंद्यकर्म काळिमा ॥३॥