भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें माझें हित होईल तो उपाव । करिसील भाव जाणोनियां

jenen majhen hit hoil to upav | karisil bhav janoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेणें माझें हित होईल तो उपाव । करिसील भाव जाणोनियां ॥१॥ मज नाहीं सुख दुःख तया खंती । भावना हे चित्तीं नाना छंदें ॥ध्रु.॥ तोडीं हे संबंध तोडीं आशापाश । मज हो सायास न करितां ॥२॥ तुका म्हणे मी तों राहिलों निश्चिंत । कवळोनि एकांतसुख तुझें ॥३॥