भजनी मालिका

भजने

जाणे अंतरिंचा भाव । तोचि करितो उपाव ॥१॥ न लगें सांगावें मांगावें । जीवें भावें अनुसरावें । अविनाश घ्यावें। फळ धीर धरोनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥२॥ मैथुनाचें सुख सांगितल्या खून । अनुभवाविण कळो नये ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जाणों जातां तुम्हा जाणीवचि विरें । तुमच्या निजध्यासें मनचि मुरे । तुमचिये भेटीं अंगचि नुरे । वाचाहि वोसरे स्तवितां तुम्हां ॥१॥ ध्यानें तुमच्या जीवचि हारपे । तुम्हांसी जाणतां बुध्दीचि करपे । तुमच्या चिंतनें चित्तहि विसर्पें । मिसळें चिद्रुपें चैतन्येंसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥१॥ मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जाणोनियां यम संतोषला मनीं । मंजुळ वचनीं काय बोले ॥१॥ केली देवें कृपा पाठविलें मज । वरदान तुज द्यावयासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जाणोनियां वेडा होसी कां रे गव्हारा । भजें तूं पामरा श्रीविठ्ठला ॥१॥ नका रे साधन व्युप्तत्तीचा भार । चुकवी वेरझारा विठ्ठलानामें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा । आनंदें केशवा भेटतांचि ॥१॥ या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे ॥२॥

रचनाकार: संत सेना