भजनी मालिका

भजने

चारी वेद गात जयासी अखंड । नेणवे प्रचंड कीर्ति ज्याची ॥१॥ तोचि भीमातीरीं उभा दिगंबर । ठेवी कटीं कर भक्तांसाठी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥१॥ गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

चारी वेद तुझ्या नांदती नगरीं । तेथें मी भिकारी काय वानूं ॥१॥ वर्णितां पार नेणे चतुरानन । तेथें मी अज्ञान काय जाणें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चारी वेदां ज्याचा नयेचि उमज । करीतसे मुंज वसु-देव ॥१॥ कर्दळीचे स्तंभें वाडे शृंगारिले । गर्गासी धाडिलें आणा-वया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चाल घरा उभा राहें नारायणा । ठेवूं दे चरणांवरी माथा ॥१॥ वेळोवेळां देई क्षेमआलिंगन । करी अवलोकन कृपादृष्टी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चाल म्हणसी बाईगे खेळों लपंडाई । जेथें तेथें साक्ष कान्हा लपो कोणें ठाई ॥१॥ झाकुनियां डोळा गे लपविली चपळा । लेपों जाति जेथें तेथें कलकलिती बाळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चालतां मारगीं फुटतसे वाट । मागतो वो भाट सहजीं होय ॥१॥ तैसें नोहे संतमार्गाचें लक्षण । चालत मागुन आले सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चालतानां वाटें अपूर्व देखिलें । मनीं हें वहिलें द्वारका दिसे ॥१॥ श्रमलासे मनीं न सुचे विचार । म्हणे द्वारके सत्वर कैसा आलों ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चालली ते यात्रा गेली द्वारकेसी । करूनि स्नानासी नगरामध्यें ॥१॥ पहावया घर दुकान हुंडीचें । न दिसे हो साचें तत्क्षणीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या ॥१॥ ऐका जी वोजे पडतसें पायां । भावाचि तें जायावाट नव्हे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चालियेलं तेव्हां गडी आणि देव । खेळताती सर्व आनंदानें ॥१॥ वत्साचिया वेषें वत्सासूर आला । माराया कृष्णाला परीक्षिती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चालिला देवाचे भेटीला सन्मुख । ब्राम्हणाचा हरिख न समाये ॥१॥ पाहातां लोचनीं राजीवलोचन । भावाचे मोचन तेचि काळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव