भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालिला देवाचे भेटीला सन्मुख । ब्राम्हणाचा हरिख न समाये

chalila devache bhetila sanmukh | bramhanacha harikh na samaye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चालिला देवाचे भेटीला सन्मुख । ब्राम्हणाचा हरिख न समाये ॥१॥ पाहातां लोचनीं राजीवलोचन । भावाचे मोचन तेचि काळीं ॥२॥ सभा ते साजिरी रत्न सिंहासनीं । देव चुडामणी शोभतसे ॥३॥ राईरखुमाई चामरें ढाळिती । राधा उभी हातीं घेउनी छत्र ॥४॥ समारंभें पुढें गरुड तो उभा । शोभतसे शोभा दिव्य कांहीं ॥५॥ यादवांची सभा दाटलीसे भारी । नाना उपचारी रिद्धी सिद्धी ॥६॥ उद्धव अक्रूर उभे पायांपासीं । देवादिदेवासी विडे देत ॥७॥ नामदेव तेथें उभा होता निका । घेऊनि पादुका दोन्ही हातीं ॥८॥