भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालतां लवडसवडी । बाहुली मुरडली

chalatan lavadasavadi | bahuli muradali

चालतां लवडसवडी । बाहुली मुरडली । माथां गोरसाची दुरडी । जाय मथुरे हाटा ॥ सवेंची विचारी जिवीं । महियाते सादावीं । तंव तो अवचिती पालवी । नंदनंदनु ॥ पाहेपां सुखाचेनि मिसें । झणी करी अनारिसे । तेव्हां उरलें तें कैसें । माझें मनुष्यपण ॥ विनवी सखीयातें आदरें । तुह्मीं गुह्याचीं भंडारे । अघटित घडिलीं या शरीरें । प्रगटीत न करा साजणी वो ॥१॥ काय करणें वो काय करणें वो । देखोनी सांवळा तनु । लुब्धला माझा मनु । लागलेंसें ध्यानु । द्वैत निवडे ना । डोळा भरुनिया बाळा देखे श्रीरंगु सांवळा । वेध वेधल्वा सकळां । गोपी गोविंदा सवे ॥ ठेला प्रपंचु माघारा । भावो भिनला दुसरा । पडिला मागिल विसरा । कैचें आपुलेंपण ॥ सहज करिता गोष्टी । पाहातां पडिली मिठी । जाली जन्में साठी । सखियेसाजणी वो ॥२॥ ऐसें सोसितां सोसणी । सखी झाली विरहिणी । आतां मथुरा भुवनीं । मज गमेल कैसें ॥ सरलें सांजणें विकणें । निवांत राहिलें बोलणें । पूर्ण गोरसा भरणें । माथा त्यजूनिया ॥ जाली अकुळाचें कुळ । तनु जाते बरळ फ़िटलें भ्रांतीपडळ । दोन्ही एक जालीं ॥ बापरखुमादेविवरीं । अवस्था लाऊनि पुरी । भावें भोगूनी श्रीहरी । मन मुक्त साजणी वो ॥३॥