भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या

chalava panth to pavije tya thaya | aikilya vanyan varata tya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या ॥१॥ ऐका जी वोजे पडतसें पायां । भावाचि तें जायावाट नव्हे ॥ध्रु.॥ व्याली कुमारीचा अनुभवें अनुभव । सांगतां तो भाव येत नाहीं ॥२॥ तुका म्हणे येथें पाहिजे आरालें । बिंबीं निवळलें तरि भासे ॥३॥