भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालता पंढरीची वाट

chalata pandharichi vat

रचनाकार: संत बोधले · अभंग
चालता पंढरीची वाट । पाप पळती हातोहात ॥१॥ मिळाला वैष्णवाचा भार । आनंदे करिती जयजयकार ॥२॥ लोळणि घालुनिया पायावरि । फुका मोक्ष देतो हरि ॥३॥ बोधला म्हणे सत्य जाणा । बाप पंढरीचा राणा ॥४