भजनी मालिका
← भजनांकडे परत

चारी वेद गात जयासी अखंड । नेणवे प्रचंड कीर्ति ज्याची

chari ved gat jayasi akhand | nenave prachand kirti jyachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चारी वेद गात जयासी अखंड । नेणवे प्रचंड कीर्ति ज्याची ॥१॥ तोचि भीमातीरीं उभा दिगंबर । ठेवी कटीं कर भक्तांसाठी ॥२॥ युद्धीं अर्जुनातें सांगितली गीता । सहस्रशा कांता केल्या ज्यानें ॥३॥ नामा हाणे शिवा दिल्हें शिवपण । ब्रह्मया लागोन उपदेश ॥४॥