भजनी मालिका
← भजनांकडे परत

चारी वेदां ज्याचा नयेचि उमज । करीतसे मुंज वसु-देव

chari vedan jyacha nayechi umaj | karitase munj vasu-dev

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चारी वेदां ज्याचा नयेचि उमज । करीतसे मुंज वसु-देव ॥१॥ कर्दळीचे स्तंभें वाडे शृंगारिले । गर्गासी धाडिलें आणा-वया ॥२॥ देशोदेशीं चिठया लिहिल्या वसुदेवें । मुंजीसीठीं यावें कृष्णजीच्या ॥३॥ मथुरेचे लोक आणिती आहेर । होतसे गजर वाजंत्रांचा ॥४॥ उग्रसेनें तेव्हां फोडिलें भांडार । द्विजांसी अपार द्रव्य दिल्हें ॥५॥ विष्णुदास नामा वांटितो सुपारी । झाले ब्रह्मचारी रामकृष्ण ॥६॥