भजनी मालिका

भजने

घोंगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यांत ॥१॥ कान्होबा तो मी च दिसें । लाविलें पिसें संवगडियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥१॥ माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें ॥१॥ हा गे चोर धरा धांवा कोणी । घरांत राहाटे चहूं कोणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीत मना ॥१॥ पुढें तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घोंटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हातीं । मुक्तं आत्मिस्थती सांडवीन ॥१॥ ब्रम्हीभूत होते काया च कीर्तनीं । भाग्य तरी ॠणी देवा ऐसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घ्यां रे भाई घ्यां रे भाई । कोणी कांहीं थोडे बहु ॥१॥ येच हाटीं येच हाटीं । बांधा गाठी पारखून ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घ्या रे भोंकरें भाकरी । दहींभाताची सिदोरी । ताक सांडीं दुरी । असेल तें तयापें ॥१॥ येथें द्यावें तैसें घ्यावे । थोडें परी निरें व्हावें । सांगतों हे ठावें । असों द्या रे सकळां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घ्या रे रामनामाची कावड भाई । शिव हरहर वदा भाई ॥१॥ अकार उकार मकार तिचा पाया । उभारिले त्रिगुण तनयां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घ्या रे लुटी प्रेम सुख । फेडा आजि धणी । चुकला तो मुकला । झाली वेरझारी हाणी ॥१॥ घाला घातला वैकुंठीं । करूनियां जीवें साटी । पुरविली पाठी । वैष्णवीं काळाची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घ्यावी तरी घ्यावी उदंड चि सेवा । द्यावें तरी देवा उदंड चि ॥१॥ ऐसीं कैंचीं आम्ही पुरतीं भांडवलें । आल्या करीं बोलें समाधान ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चक्रतीर्थीं पाहा उभा तो गोपाळ । पुढें विणे टाळ वाजताती ॥१॥ स्वर्गींहुनि पुष्पें वर्षती सुरवर । उभे ऋषीश्वर समुदायेंसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चक्रवाक पक्षी वियोगें बाहाती । बालें मजप्रती तैसें आतां ॥१॥ चुकलिया माय बाळकें रडती । झालें मजप्रती तैसें आतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चक्षुदर्पणीं जग हें पहा । जगज्जीवनीं मुरुनी रहा । तूर्या कालिंदि तीर्थीं नाहा । पापपुण्यासी तिळांजुळीं वहा ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

चंचळ चांदिणें सोमविणें भासलें । तेज निमालें रविबिंबेंविणें ॥१॥ जगत्रजीवनु ह्मणे जगासी कारण । तें अणुप्रमाण तेथे दिसे ॥२॥