भजनी मालिका
← भजनांकडे परत

घोंगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यांत

ghongadiyancha palat kela | mulammulan apulyant

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घोंगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यांत ॥१॥ कान्होबा तो मी च दिसें । लाविलें पिसें संवगडियां ॥ध्रु.॥ तो बोले मी उगाच बैसें । आनारिसें न दिसे ॥२॥ तुका म्हणे दिलें सोंग । नेदी वेंग जाऊं देऊं ॥३॥