भजनी मालिका
← भजनांकडे परत

घ्या रे रामनामाची कावड भाई । शिव हरहर वदा भाई

ghya re ramanamachi kavad bhai | shiv harahar vada bhai

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घ्या रे रामनामाची कावड भाई । शिव हरहर वदा भाई ॥१॥ अकार उकार मकार तिचा पाया । उभारिले त्रिगुण तनयां ॥२॥ हरिहर कावड घेतां खांदीं । तुटे जन्ममरण व्याधी ॥३॥ घेऊनि कावडी नाचे एका । एका जनार्दनीं आवडी देखा ॥४॥