भजनी मालिका
← भजनांकडे परत

घ्यां रे भाई घ्यां रे भाई । कोणी कांहीं थोडे बहु

ghyan re bhai ghyan re bhai | koni kanhin thode bahu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घ्यां रे भाई घ्यां रे भाई । कोणी कांहीं थोडे बहु ॥१॥ येच हाटीं येच हाटीं । बांधा गाठी पारखून ॥ध्रु.॥ वेच आहे बेच आहे । सरले पाहे मग खोटे ॥२॥ उघडें दुकान उघडें दुकान । रात्री झाली कोण सोडी मग ॥३॥ तुका म्हणे अंतकाळीं । जाती टाळीं बैसोनीं ॥४॥