भजनी मालिका
← भजनांकडे परत

घ्यावी तरी घ्यावी उदंड चि सेवा । द्यावें तरी देवा उदंड चि

ghyavi tari ghyavi udand chi seva | dyaven tari deva udand chi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घ्यावी तरी घ्यावी उदंड चि सेवा । द्यावें तरी देवा उदंड चि ॥१॥ ऐसीं कैंचीं आम्ही पुरतीं भांडवलें । आल्या करीं बोलें समाधान ॥ध्रु.॥ व्हावें तरीं व्हावें बहुत चि दुरी । आलिया अंतरीं वसवावें ॥२॥ तुका म्हणे तुझें सख्यत्व आपणीं । अससील ॠणी आवडीचा ॥३॥