भजनी मालिका
← भजनांकडे परत

घ्यावया वोखदाची वाटी । माता साखर दे चिमुटी

ghyavaya vokhadachi vati | mata sakhar de chimuti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घ्यावया वोखदाची वाटी । माता साखर दे चिमुटी ॥१॥ तेणेंक घोटी गोडपणें । हारे व्याधी नाना पेणें ॥२॥ तयासाठीं घाबरी । माता होय ती निर्धारी ॥३॥ शरण एका जनार्दनीं । तैसा लोभ ठेवा मनीं ॥४॥