भजनी मालिका
← भजनांकडे परत

चक्रवाक पक्षी वियोगें बाहाती । बालें मजप्रती तैसें आतां

chakravak pakshi viyogen bahati | balen majaprati taisen atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चक्रवाक पक्षी वियोगें बाहाती । बालें मजप्रती तैसें आतां ॥१॥ चुकलिया माय बाळकें रडती । झालें मजप्रती तैसें आतां ॥२॥ वत्स न देखतां गाई हुंबरती । झालें मजप्रती तैसें आतां ॥३॥ जीवनवेगळे मत्स्य तळमळती । झालें मजप्रती तैसें आतां ॥४॥ नामा ह्मणे मज ऐसें वाटे चित्तीं । करीतसें खंती फार तुझी ॥५॥