भजनी मालिका
← भजनांकडे परत

घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें

ghongadiyas ghatali mithi | na sodi sati keli jiven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें ॥१॥ हा गे चोर धरा धांवा कोणी । घरांत राहाटे चहूं कोणी ॥ध्रु.॥ नोळखवे म्यां धरिला हातीं । देह्यादिप माय लाविली वाती ॥२॥ न पावे धांवणें मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥३॥