भजनी मालिका

भजने

गीतेंचें सुव्रत । ज्यासी जालें प्राप्त । त्याचे पितर मुक्त । सहजचि जाले ॥१॥ नष्ट चांडाळ दुर्जन । परदारी तस्कर मात्रागमन । त्यासी गीता आवर्तन । श्रवणें मोक्ष होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुडघेमेटाइ बैसले तोंडी खरस आलें । ते असे देखिले रामकृष्णें ॥१॥ मोहरी काढोनि लावियली मुखा । नांदे तिहीं लोकां मोहियलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुंडालिल्या जटा तोचि माथा केटा । गोजिरा गोमटा रामचंद्र ॥१॥ वैकुंठींचा राजा म्हणवितो योगी । दावावया जगीं योग करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गुण दोष त्याचे ह्मणतां श्लाधीजे । निर्वासन किजे चित्त आधीं ॥१॥ गाऊं नाचूं आनंदें कीर्तनीं । भुक्ति मुक्ति दोन्ही नको देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गुण दोष माझे पाहों नको आतां । तारिसी अनंता मज आतां ॥१॥ अगाध महिमा काय वानूं हरी । गोकुळाभीतरीं गाई राखी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गुण लावण्य संपत्ती । पांडुरंग बाळमूर्ती । सर्व सुखाची विश्रांती । चरणी लोळती महा सिध्दी ॥१॥ विटे पाउलें समान । कांसे क्षीराब्धी परिधान । हात कटावरी ठेवून । तुळशीसुमन वनमाळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गुणांची आवडी वाचेचा पसरू । पडिला विसरू सर्वरसां ॥१॥ आदि मध्य अंतीं नाहीं अवसान । जीवानीं जीवन मिळोनी गेलें ॥धृ॥

रचनाकार: संत तुकाराम

गुंतला सर्प भुलला नादा । तैसी प्राणियासी आपदा संसाराची ॥१॥ सदा तळमळ मन नाहीं स्थिर । भोगिती अघोर जन्मोजन्मीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ