भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुणाचेनि आटोपें आकारलें ब्रह्म

gunacheni atopen akaralen brahma

गुणाचेनि आटोपें आकारलें ब्रह्म । भक्तभाग्य सम आलेंसे ॥१॥ चैतन्य परिपाठीं ठासा घडलासे साकार । कृष्णचि आकार गोकुळीं रया ॥ त्या रुपें विधिलें काय करुंगे माये । नाम रुप सोय नाहीं आम्हां ॥२॥ सबाह्य सभोवतें चतुर्भुज सांवळें । सर्वभूतीं विवळे कृष्णरुपें ॥ हारपले आकार कृष्णचि क्षरला । वेदांसि अबोला श्रुतीसहित ॥३॥ ऐसें परब्रह्म सांवळें दैवत आमुचे । आतां आह्मां कैचें क्रिया कर्म ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु दैवत । मनें घर तेथें चरणीं केलें ॥४॥