भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुंतला सर्प भुलला नादा । तैसी प्राणियासी आपदा संसाराची

guntala sarpa bhulala nada | taisi praniyasi apada sansarachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गुंतला सर्प भुलला नादा । तैसी प्राणियासी आपदा संसाराची ॥१॥ सदा तळमळ मन नाहीं स्थिर । भोगिती अघोर जन्मोजन्मीं ॥२॥ नळिका यंत्रामाजीं सांपडे वानर । संसारीं तो नर तैसा गुंते ॥३॥ एका जनार्दनीं करितां नाना युक्ति । मागें ही फजिती पुढें होती ॥४॥