भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुणा आला विटेवरी । पीतांबरधारी सुंदर जो

guna ala vitevari | pitambaradhari sundar jo

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गुणा आला विटेवरी । पीतांबरधारी सुंदर जो ॥१॥ डोळे कान त्याच्या ठायीं । मन पायीं राहो हें ॥ध्रु.॥ निवारोनी जाय माया । ऐसी छाया जयासी ॥२॥ तुका म्हणे समध्यान । हे ते चरण सुकुमार ॥३॥