भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुणांची आवडी वाचेचा पसरू । पडिला विसरू सर्वरसां

gunanchi avadi vachecha pasaru | padila visaru sarvarasan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गुणांची आवडी वाचेचा पसरू । पडिला विसरू सर्वरसां ॥१॥ आदि मध्य अंतीं नाहीं अवसान । जीवानीं जीवन मिळोनी गेलें ॥धृ॥ रामकृष्ण नाममाळा हे साजिरी । ओविली गोजिरी कंठाजोगी ॥२॥ तुका म्हणे तनु झालीसे शीतळ । अवघी सकळ ब्रम्हानंदे ॥३॥