भजनी मालिका

भजने

काय हें मातेसी बाळें शिकवावें । आपुल्या स्वभावें वोढतसे ॥१॥ तैसाच प्रकार तुमचीये घरीं । ऐसीच निर्धारी आली वाट ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

काया कर पैं फुटों नेदी । टाळ विंडी वाहिन खांदीं ॥१॥ तूं बा माझा तूं बा माझा । तूं बा माझा केशिराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काया मनें वाचा नेणों भक्तिभाव । करिसी उपाव केशिराजा ॥१॥ थोरपणासाठीं मन घे हव्यासु । मी तो कासाविसु होय देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काया वाचा मन एकविध करी । एक देह धरी नित्य सुख ॥ १ ॥ अनेकत्व सांडीं अनेकत्व सांडीं । आहे तें ब्रह्मांडीं रूप तुझें ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

काया वाचा मन एकविध करी । पाहे तो श्राहरी पंढरीये ॥१॥ ब्रह्मादिका जया ध्याती शिवादि वंदिती । ती विटेवरी मूर्ति पांडुरंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काया वाचा मनें श्रीमुखाची वास । आणीक उदास विचारांसी ॥१॥ काय आतां मोक्ष करावा जी देवा । तुमचिया गोवा दर्शनासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कायारूप जिचें हिनवट अती । माउली धन्य ती आहे नारी ॥१॥ तियेवरी मन कदापी नव जाये । भजना न होये कदाचळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कायावाचा मन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥१॥ अवघें आलें आंत पोटा पडिलें थीत । सारूनि निंश्चित जालों देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कायावाचामनें जाला विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना ॥१॥ विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कायावाचामनें निग्रह करीं । कीर्तन सर्व भावे ऐकें निर्धारीं । अष्टांग साधन न करी । सुखें करी कीर्तन ॥१॥ देव तुष्टेल तुष्टेल । सर्वभाव तुझा पुरवेल ॥ध्रु॥

रचनाकार: संत एकनाथ