भजनी मालिका
← भजनांकडे परत

काया वाचा मन एकविध करी । एक देह धरी नित्य सुख

kaya vacha man ekavidh kari | ek deh dhari nitya sukh

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
काया वाचा मन एकविध करी । एक देह धरी नित्य सुख ॥ १ ॥ अनेकत्व सांडीं अनेकत्व सांडीं । आहे तें ब्रह्मांडीं रूप तुझें ॥ २ ॥ निर्वासना बुद्धि असतां एकपणें । सहज भोगणें ऐक्य राज्य ॥ ३ ॥ म्हणे गोरा कुंभार नाहीं रूप रेख । तेंचि तुझें सुख नामदेवा ॥ ४ ॥