भजनी मालिका
← भजनांकडे परत

कायावाचा मन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं

kayavacha man thevilen gahan | ghetalen tujhen rin jodilagin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कायावाचा मन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥१॥ अवघें आलें आंत पोटा पडिलें थीत । सारूनि निंश्चित जालों देवा ॥ध्रु.॥ द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मवेशा तुज ठावी ॥२॥ तुझ्या रिणें गेले बहुत बांधोनी । जाले मजहूनी थोरथोर ॥३॥ तुका म्हणे तुझे खतीं जें गुंतलें । करूनि आपुलें घेई देवा ॥४॥