भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥ धर्म नीतीचा हा ऐकावा वेव्हार । निवडिले सार असार तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दसरा दिवाळी तोचि आम्हां सन । सखे संतजन भेटतील ॥१॥ आमुप जोडल्या पुण्याचिया राशी । पार त्या सुखासी नाहि लेखा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दहएांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये ॥१॥ आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टि वरी ॥१॥ तेणें सुखें छंदें घेईन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्यां॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दाढी डोई मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरति बरवें वस्त्र काळें ॥१॥ उफराटी काठी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रासी॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

दास जालों हरीदासांचा । बुद्धीकायामनेंवाचा ॥१॥ तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंग कल्लोळ । नासे दुष्टबुद्धी सकळ । समाधि हरीकीर्त्तनीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम