भजनी मालिका
← भजनांकडे परत

दावूनियां मांड । पुरे न करीती भांड

davuniyan mand | pure na kariti bhand

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दावूनियां मांड । पुरे न करीती भांड ॥१॥ जळो जळो तैसें जिणें । फटमरे लाजिरवाणें ॥ध्रु.॥ घेतलें तें सोंग । बरवें संपादावें सांग ॥२॥ तुका म्हणे धीरें । देव नुपेक्षिलें खरें ॥३॥