भजनी मालिका
← भजनांकडे परत

दर्पणासी नखटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि

darpanasi nakhaten laje | shuddha khije dekhoni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दर्पणासी नखटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥१॥ ऐसें अवगुणांच्या बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ध्रु.॥ अंधळ्यास काय हिरा । गारां चि तो सारिखा ॥२॥ तुका म्हणे भुंके सुनें । ठाया नेणे ठाव तो ॥३॥