भजनी मालिका
← भजनांकडे परत

दाखवूनि आस । केला बहुतांचा नास

dakhavuni as | kela bahutancha nas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दाखवूनि आस । केला बहुतांचा नास ॥१॥ थोटा झोंडा शिरोमणी । भेटलासी नागवणी ॥ध्रु.॥ सुखाचें उत्तर । नाहीं मुदलासी थार ॥२॥ तुका म्हणे काय । तुझे घ्यावें उरे हाय ॥३॥