भजनी मालिका
← भजनांकडे परत

दास जालों हरीदासांचा । बुद्धीकायामनेंवाचा

das jalon haridasancha | buddhikayamanenvacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दास जालों हरीदासांचा । बुद्धीकायामनेंवाचा ॥१॥ तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंग कल्लोळ । नासे दुष्टबुद्धी सकळ । समाधि हरीकीर्त्तनीं ॥ध्रु.॥ ऐकतां हरीकथा । भक्ती लागे त्या अभक्तां ॥२॥ देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ॥३॥ हें सुख ब्रह्मादिकां । नाहीं नाहीं म्हणे तुका ॥४॥